त्या वर्तनाबद्दल स्मिथनं मागितली माफी
चौथ्या टेस्टदरम्यान भारताच्या मुरली विजयला शिवीगाळ केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टिव्ह स्मिथनं माफी मागितली आहे.
धर्मशाला : चौथ्या टेस्टदरम्यान भारताच्या मुरली विजयला शिवीगाळ केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टिव्ह स्मिथनं माफी मागितली आहे. त्यावेळी माझ्या भावनांवर मला ताबा ठेवता आला नाही म्हणून मी माफी मागतो असं स्मिथ मॅचनंतर झालेल्या पारितोषिक वितरण सोहळ्यावेळी म्हणाला.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या इनिंगमध्ये शेवटच्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या हेजलवूडचा कॅच मुरली विजयनं पकडला आणि भारतीय टीमनं जल्लोष करायला सुरुवात केली. या कॅचबद्दल अंपायरना डाऊट आल्यामुळे त्यांनी थर्ड अंपायरकडे धाव घेतली.
मुरली विजयनं पकडलेला हा कॅच जमिनीला टेकलेला असल्याचं दिसल्यामुळे थर्ड अंपायरनं हेजलवूडला नॉट आऊट दिलं. यानंतर ड्रेसिंग रूममध्ये असलेल्या स्मिथनं चुकीचं अपील केल्याबद्दल भारतीय टीमबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली.