नवी दिल्ली : भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंग, इशांत शर्मा आणि त्यानंतर आता आणखी एक खेळाडू लग्नाच्या बोहल्यावर चढतोय. भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री पुढल्या वर्षी मार्चमध्ये त्याची गर्लफ्रेंड सोनम भट्टाचार्य हिच्याशी लग्नबंधनात अडकतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचे माजी फुटबॉलपटू सुब्रतो भट्टाचार्य यांची ही कन्या आहे. सोनमने स्कॉटलंड स्थित युनिर्व्हसिटीमधून मॅनेजमेंटची डिग्री घेतलीये. सध्या कोलकातामध्ये सॉल्ट लेक हे टू स्टार हॉटेल ती चालवतेय.


छेत्री इंडियन सुपर लीगमध्ये रणबीर कपूरच्या मुंबई सिटी एफसीचा भाग आहे. तसेच बंगळूरु एफसी क्लबकडूनही तो खेळतो.