हैदराबाद: आयपीएलच्या यंदाच्या मोसमामध्ये मुंबई इंडियन्सची हाराकिरी सुरुच आहे. सनरायजर्स हैदराबादनं मुंबई इंडियन्सचा तब्बल 7 विकेट्स आणि 15 बॉल राखून पराभव केला आहे. यंदाच्या मोसमातला हैदराबादचा हा पहिलाच विजय आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हैदराबादच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो कॅप्टन डेव्हिड वॉर्नर. 143 रनचा पाठलाग करताना ओपनिंगला आलेल्या डेव्हिड वॉर्नरनं 59 बॉलमध्ये 90 रन केल्या. वॉर्नरलाच मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यात आला. हैदराबादचा दुसरा ओपनिंग बॅट्समन शिखर धवन मात्र अजूनही फॉर्मसाठी झगडताना दिसत आहे. धवननं या मॅचमध्ये फक्त 2 रन केल्या. 


त्याआधी हैदराबादनं टॉस जिंकून मुंबईला पहिले बॅटिंगला पाठवलं. पण मुंबईची सुरुवात मात्र चांगली झाली नाही. आयपीएलमधला आपला पहिलाच सामना खेळणारा आणि ओपनिंगला आलेला मार्टिन गप्टील 2 रन वर आऊट झाला.


मुंबईला 142 रनपर्यंत पोहोचवलं ते अंबाती रायडू आणि कृणाल पांड्यानं. रायडूनं 49 बॉलमध्ये 54 रन तर कृणाल पांड्यानं 28 बॉलमध्ये 49 रन केल्या. 


या पराभवामुळे मुंबई इंडियन्स पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर गेली आहे. तर आपला पहिलाच विजय मिळवणारी हैदराबाद सहाव्या क्रमांकावर गेली आहे.