हैदराबाद : घरच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात हैदराबादने मुंबईवर सात विकेट राखून विजय मिळवलाय. मुंबईने हैदराबादसमोर विजयासाठी 139 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान हैदराबादने सात विकेट तसेच 10 चेंडू राखून मोबदल्यात पूर्ण केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्लेऑफमध्ये टिकून राहायचे असल्यास हैदराबादला हा सामना जिंकणे महत्त्वाचे होते. हैदराबादकडून शिखर धवनने 46 चेंडूत नाबाद 62 धावांची खेळी केली. 


याआधी हेन्रिंकने 35 चेंडूत 44 धावा केल्या होत्या. मुंबईने नाणेफेक जिंकताना प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांना चांगलाच महागात पडला. हैदराबादच्या खेळाडूंनी मुंबईची धावगती रोखत त्यांचा डाव 138 धावांवर रोखला. हे आव्हान हैदराबादने 18.2 षटकांत पूर्ण केले.