नवी दिल्ली : 'आयपीएल'मधील नवीन संघ 'गुजरात लायन्स'च्या जर्सीचे अनावरण संघमालक केशव बन्सल आणि कर्णधार सुरेश रैना यांनी केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडियन प्रीमिअर लीग-९मध्ये पहिल्यांदा गुजरात लायन्स टीम दाखल झाली आहे. टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडू आणि गुजरात टीमचा कर्णधार सुरेश रैनाने ही जर्सी लॉन्च केली. जर्सीत मुख्य रंग लाल असूर कॉलर आणि छातीचा भाग निळ्या रंगाची पट्टी आहे.


गुजरात टीमने पुणे सुपरजाईंट्सबरोबर पहिल्यांदा आयपीएलमध्ये भाग घेतला आहे. या दोन्ही टीमला चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यावर बंदी आणल्यानंतर या टीमना पहिल्यांदा खेळण्याची संधी मिळाली आहे.