२०१७ मध्ये कुस्तीपट्टू सुशील कुमार करणार WWEमध्ये पदार्पण
दोनवेळचा ऑलिम्पिक मेडल विजेता सुशील कुमार लवकरच WWEमध्ये दिसू शकतो, अशा चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, या संदर्भात अजूनही सुशील कुमारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
नवी दिल्ली : दोनवेळचा ऑलिम्पिक मेडल विजेता सुशील कुमार लवकरच WWEमध्ये दिसू शकतो, अशा चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, या संदर्भात अजूनही सुशील कुमारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
परंतु ३३ वर्षीय या पहेलवानाच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार सुशीलकुमार २०१७ मध्ये प्रोफेशनल रेसलिंगमध्ये पदार्पण करणार आहे. सुशील कुमारने आपल्या भविष्यासाठी WWE शी करार केला आहे.
सुशील कुमार यांच्याकडे WWEसोबत TNA आणि NJPW ने देखील ऑफर दिली होती. पण सुशील कुमारने अखेर WWEला होकार कळविल्याचे समजते आहे.
WWEचे अधिकारी सुशील कुमारच्या नियमित संपर्कात होते. यंदा सुशील कुमार रिओ ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊ शकला नाही. त्यामुळे आता तो नवीन मार्ग चोखाळत आहे.
WWEच्या अधिकाऱ्यांना आपल्या शोमध्ये एका भारततीय कुस्तीपट्टू गरज आहे. तो भारत आणि अमेरिकेतही पॉप्युलर हवा.
WWEच्या जगात सुशील कुमार दुसरा कर्ट अँगल होऊ शकतो.
कर्ट अँगलही ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट आहे.