मुंबई : टी-२०चा दुसरा सेमी फायनल सामना मुंबईत होत आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात हा सामना संध्याकाळी होत आहे. मात्र, युवराज सिंगच्या जागी कोणाला खेळवायचे याबाबत कर्णधार महेंद्रसिंग धोनी द्विधा मनस्थितीत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनी आणि टीम व्यवस्थापक यांना याबाबत निर्णय घेणे अवघड झाले आहे. सामना संध्याकाळी होत असला तरी निर्यण होऊ शकलेला नाही. टीम इंडियात युवीची जागा मुंबईचा अजिंक्य रहाणे घेण्याची शक्यता जात आहे. त्याला संधी मिळले असे बोलले जात आहे. त्याचा समर्थ अनेकांचा कौल सकारात्मक दिसत आहे. त्यांने जास्त वेळ टीम इंडियासोबत घालविला आहे. 


तर दुसरीकडे मनिष पांडे हा उंच शॉ़ट मारण्यात माहीर आहे. त्यामुळे त्याला संधी मिळण्याची शक्यताही आहे. मनिषकडे हिटर म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे युवीप्रमाणे तोही फटके मारील, याच निकषावर त्यालाही संधी मिळेल असेही म्हटले जात आहे. टी-२०चा त्याचा रेकॉर्ड चांगला आहे. मात्र, त्यालाही टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही.