कोलकाता : इंग्लंडने आम्हाला चौकार मारण्यापासून रोखून दाखवावे असे आव्हान आमच्याकडे चौकार मारणारा संघ आहे. त्यामुळे प्रतिस्पर्ध्याला आम्हाला चौकार मारण्यापासून रोखावे लागेल. आम्ही सुरु झाल्यानंतर आम्हाला रोखणे प्रतिस्पर्ध्याला कठिण आहे, असे वेस्ट इंडिजचा कर्णधार डॅरन सॅमीने दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसी टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी बोलताना सॅमीने हे आव्हान दिले. 


उपांत्यफेरीच्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचे १९३ धावांचे लक्ष्य पार करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. वेस्ट इंडिजकडे ख्रिस गेल हा सर्वात धोकादायक फलंदाज आहे. 
 
सॅमीने सांगितले. या वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजच्या संघाने आतापर्यंत तीस षटकार मारले आहेत तर, इंग्लंडच्या संघाने ३४ षटकार मारेल आहेत.