बंगळुरू : पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर आत्मविश्वास मिळविलेल्या टीम इंडियाचा आता बुधवारी २३ मार्चला बांगलादेशशी सामना होणार आहे.  बांगलादेशला हरवून थेट सेमी फायनलमध्ये जाण्याचे भारतीय संघाचे आता लक्ष्य असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 भारतीय संघाने बांगलादेशला एशिया कपमध्ये मोठा दणका दिला होता आता टी२० वर्ल्डकपमध्येही भारताकडून विजयाची अपेक्षा केली जात आहे.


 न्यूझीलंडकडून हरल्यानंतर भारतीय संघ पाकिस्तानला हरवून पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आला आहे. न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाचा नेट रन रेट खाली आला आहे. त्यामुळे बांगलादेशसोबत मोठ्या फरकाने विजय मिळवून भारत ग्रुपमध्ये वरच्या क्रमांकावर येण्यासाठी लढेल.  भारताचा सध्याचा नेट रन रेट ०.९० आहे. तो चांगला करण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे. 
 
तेच बांगलादेश टूर्नामेंटमधून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. जर बांगलादेश जिंकला तरी त्याला शेवटच्या चार संघात येण्यासाठी नेट रन रेट वाढवणे कठीण आहे. तसं दोन्ही संघाच्या फॉर्मबाबत बोलायचे तर भारत या सामन्यात वरचढ ठरण्याची शक्यता आहे. पण बांगलादेश कधी काय करेल याचाही काही नेम नाही.