सेमी फायनलमधील संघाबाबत सचिनची भविष्यवाणी
क्रिकेटचा देव मास्टर ब्लासटर सचिन तेंडुलकर याने यंदाच्या टी २० क्रिकेट वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्य कोणते चार संघ असतील याबाबत भविष्य वाणी केली आहे.
मुंबई : क्रिकेटचा देव मास्टर ब्लासटर सचिन तेंडुलकर याने यंदाच्या टी २० क्रिकेट वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्य कोणते चार संघ असतील याबाबत भविष्य वाणी केली आहे.
सचिनने आपल्या दांडग्या अनुभवाच्या जोरावर गेल्या काही दिवसातील खेळींच्या आधारावर मत बनविले आहे. त्याला भविष्यवाणी म्हणता येणार नाही. पण हे सचिनचे वैयक्तीक मत आहे.
सचिन नुसार भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लड हे चार संघ अंतीम चारमध्ये असणार आहेत.
- भारतीय संघ गेल्या काही दिवसांपासून खूप चांगला खेळ करत आहे. त्यामुळे ते अंतीम चारमध्ये आहेत.
- इंग्लडचा संघ हा धक्का देण्याची क्षमता आहे. त्यामुळे हा संघ अंतीम चारमध्ये धडक मारेल.
- आफ्रिकेच्या संघात अखेरपर्यंत खेळणारे खेळाडू आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याकडे एबी डिव्हिलअर्स आहे.
- ऑस्ट्रेलियाकडे गोलंदाजी चांगली फळी आहे. त्यामुळे त्यांची शक्यता अंतीम चारमध्ये नाकारता येणार नाही.