नागपूर :  टी २० वर्ल्डकपमध्ये भारताविरूद्ध मंगळवार होणाऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा संघ काळ्या पट्ट्या लावून मैदानात उतरणार आहे. न्यूझीलंडचे माजी कर्णधार मार्टीन क्रो यांचे कर्करोगाने निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी काळ्या पट्ट्या लाावणार आहे. 



राष्ट्रगीतानंतर दोन मिनिटांचे मौन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किवी कर्णधार विल्यमसन याने नागपूर सांगितले की मंगळवारी होणाऱ्या सामन्यात आम्ही काळ्या पट्टया लावन खेळणार आहे. तसेच दोन्ही संघांच्या राष्ट्रगीतानंतर दोन मिनिट मौन राखले जाणार आहे. 


१७ शतक आहे मार्टिन क्रो यांच्या नावावर 


बराच काळ कॅन्सरपासून लढणाऱ्या ५३ वर्षीय क्रो यांचे ३ मार्च रोजी ऑकलंड येथे निधन झाले. विल्यमसन म्हटला की टीममध्ये काही जण मार्टीनच्या खूप जवळचे होते. त्यांची कमतरता जाणवेल. क्रो यांनी ऑस्ट्रेलिया विरूद्ध पदार्पण केले होते. त्यात ७७ टेस्ट खेळल्या, त्यात ४५.३६ च्या सरासरीने ५४४४ धावा केल्या, त्यात १७ शतकांचा समावेश आहे.