नवी दिल्ली : भारताने बांगलादेश विरूद्धच्या टेस्ट सामन्यात असं काही करून दाखवलं की, जगातील कोणत्याही टीमला ते अजून जमलेलं नाही. भारतने बांगलादेशसमोर टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या डावात ६८७ धावांचा डोंगर उभा केला. या धावसंख्यमुळे टीम इंडियाला टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात मानाचं स्थान मिळालं.


भारताचे एकापाठोपाठ ३ सामन्यात ६०० रन्स 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलादेशविरूद्ध खेळल्या गेलेल्या एक मात्र कसोटी सामन्यातील, पहिल्या डावात टीम इंडियाने ६८७ धावा केल्या. या आधी इंग्लंड विरूद्ध पाच कसोटी सामन्यात शेवटच्या २ कसोटी सामन्यात टीम इंडियाने ६०० पेक्षा जास्त रन्स बनवले.
इंग्लंड विरूद्ध चौथ्या कसोटी सामन्यात मुंबईत भारताने पहिल्या डावात  ६३१ रन्स केले आणि हा सामना ३६ रन्सने जिंकला.


कसोटी सामन्यातील टीम इंडियाचे बेस्ट स्कोअर


759/7d - विरुद्ध (इंग्लंड) - चेन्नई - 2016
726/9d -विरुद्ध (श्रीलंका) - मुंबई - 2009
707- विरुद्ध (श्रीलंका) - कोलंबो - 2010
705/7d - विरुद्ध (ऑस्ट्रेलिया) - सिडनी - 2004
687/6d - विरुद्ध (बांग्लादेश) - हैदराबाद - 2017