दुबई : टी-२० सीरिमध्ये ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश दिल्यानंतर आता भारतीय संघ लंकेविरुद्ध खेळण्यास सज्ज झालाय. ऑस्ट्रेलियाला ३-० असे हरवल्यानंतर भारतीय संघ टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गतविजेत्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेला ९ फेब्रुवारीपासून सुरुवात होतेय. या मालिकेत यजमान भारत लंकेविरुद्ध तीन टी-२० सामने खेळणार आहे. या मालिकेद्वारे रँकिंगमध्ये अव्वल स्थान भक्कम करण्याची संधी भारताकडे आहे तर दुसरीकडे पाहुण्या लंकेचा संघ अव्वल स्थान गाठण्यासाठी प्रयत्नशील असेल. 


जर या मालिकेत भारताने ३-० ने विजय मिळवल्यास तो अव्वल स्थान कायम राखेल तर श्रीलंका सातव्या स्थानावर घसरेल. मात्र भारताने मालिका २-१ ने जरी जिंकली तर भारत अव्वल स्थानीच राहील. श्रीलंकाची चौथ्या स्थानी घसरण होईल. पाहुण्या लंकेने भारताला या मालिकेत ३-० ने हरवल्यास ते अव्वल स्थानी पोहोचतील तर भारत सरळ सातव्या स्थानावर येईल. 


या मालिकेसाठी कसोटी कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आलीये. तो टी-२० रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी आहे. या यादीत सुरैश रैना १३ व्या स्थानी आहे. तर रोहित शर्मा १७ आणि युवराज सिंह २०व्या स्थानी आहे. गोलंदाजीच्या रँकिंगमध्ये भारताचा अव्वल गोलंदाज आर. अश्विन दुसऱ्या स्थानी आहे. लसिथ मलिंगा ८व्या तर रविंद्र जडेजा १८व्या स्थानी आहे.