मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर राज्य करणारा विराट कोहली अनेक तरुणींच्या मनावरही राज्य करतो. लाखो तरुणी त्याच्या मागे वेड्या झाल्यायत. सध्या विराट आणि अनुष्का शर्मा यांचं ब्रेक अप झाल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी आल्या असल्या तरी दोघांनी मात्र या बातमीला दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे त्यांचं ब्रेकअप झालंय असं अधिकृतपणे तरी म्हणता येणार नाही. पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचने त्याला नुकतंच आय लव्ह यू म्हटलेलं असलं तरी हे करणारी ती काही पहिली नाही. कोण आहेत त्या ज्यांनी आजवर विराटला मागणी घातलीये... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सारा जेन डियास 




२०११ विश्वचषकाच्या वेळी अशा बातम्या आल्या होत्या की विराट कोहली आणि माजी मिस इंडिया अभिनेत्री सारा जेन डियास यांच्यात काहीतरी चाललं होतं. मुंबईत झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे तिकीट तिला विराटनेच दिलं होतं अशा बातम्या आल्या होत्या. 


तमन्ना 




हिंमतवालासारखी फ्लॉप फिल्म करुन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी तमन्ना भाटियाने विराटसोबत एका जाहिरातीचे शूटिंग केले होते. त्याच दरम्यान त्यांच्यात काहीतरी गोलमाल चालू असल्याच्या बातम्या आल्या होत्या. 


डॅनियल विअॅट 




इंग्लंडच्या महिला संघातील क्रिकेटर डॅनियल विअॅटने २०१४ साली ट्विटरच्या माध्यमातून विराटप्रती तिच्या भआना व्यक्त केल्या होत्या. तिने कोहलीसोबत लग्न करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. 


अभिनेत्री इसाबेला लॉटे 




या अभिनेत्रीने स्वतःच म्हटले होते की ती आणि विराट दोन वर्ष एकमेकांना डेट करत होते. तिला विराट प्रचंड आवडत होता. पण, काही कारणास्तव त्यांचे हे प्रकरण पुढे जाऊ शकले नाही. 


अनुष्का शर्मा 




२०१४ सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी विराटने आपण अनुष्कासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे सांगितले होते. यानंतर दोघे अनेक ठिकाणी एकत्रही दिसले. पण, आता मात्र त्यांचं ब्रेकअप झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.