मुंबई : पावसाने आणलेल्या व्यत्ययानंतर भारताने आशिया कप टी-२० चा रविवारचा अंतिम सामना जिंकला खरा. पण, या सामन्यात अनेक विक्रमही प्रस्थापित झाले. काय आहेत हे विक्रम जाणून घेऊ या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत चार सामने खेळवण्यात आले. या चारही सामन्यांत भारताने विजय मिळवलाय. 


- २०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा महेंद्रसिंग धोनी पहिला कर्णधार ठरलाय. त्याच्यानंतर नंबर लागतो ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगचा (१९२ सामने) तर तिसऱ्या क्रमांकावर आहे स्टीफन फ्लेमिंग (१८० सामने). 


- भारतीय संघ सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकणारा संघ ठरलाय. भारताने सहाव्यांदा आशिया कपवर आपले नाव कोरले आहे. 


- धोनीने आशिया कपच्या फायनलमध्ये एक षटकार ठोकला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०० षटकार पूर्ण करण्याचा विक्रम आता त्याच्या नावावर आहे. त्याचप्रमाणे आत्तापर्यंत त्याने १३०० चौकारही लगावले आहेत. 


- बांग्लादेशचा कर्णधार मश्रफे मोर्तझा हा टी-२० सामन्यात एकही धावा न काढताच सर्वाधिक वेळा बाद होणारा कर्णधार ठरला आहे. 


- धोनीच्या नेतृत्वाखील भारताने पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर टी-२० फॉरमॅटमध्येही धोनीच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशिया कप जिंकला. 


- टी-२० क्रिकेटमध्ये बांगलादेशचा फलंदाज मुशफिकर रहीम सातव्यांदा रनआऊट झाला. इतक्या वेळा रनआऊट होणारा बांगलादेशचा तो पहिला फलंदाज आहे. 


- विराट कोहलीने टी-२० सामन्यात आव्हानाचा पाठलाग करताना १६ डावांत ७५८ धावा केल्यात. यावेळी कोहलीचा १३१.४चा स्ट्राईक रेट होता. तसेच त्याने आठ अर्धशतकेही लगावलीत. 


- परदेशात सर्वात जास्त जिंकणाऱ्या कर्णधाराच्या यादीत धोनी आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. परदेशांत धोनीच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या २०० सामन्यांपैकी भारताने आजवर ९९ सामने जिंकले आहेत तर ७९ सामन्यांत भारताचा पराभव झाला आहे. पहिल्या क्रमांकवर ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग आहे. १९२ सामन्यांपैकी १२६ सामने त्याने जिंकले आहे. 


- बांग्लादेशच्या मुशफिकर रहीम काल त्याच्या कारकीर्दीतीला ५०वा टी-२० सामना खेळला. इतके टी-२० सामने खेळणारा तो पहिला बांग्लादेशी खेळाडू ठरलाय. 


- पॉवर प्लेदरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज आशिष नेहराने आशिया कपच्या फायनलमध्ये जबरदस्त कामगिरी केली.


- २०१६ मध्ये भारताने ११ पैकी १० टी-२० सामन्यांत विजय मिळवला आहे. या कॅलेंडर वर्षात भारतीय संघाने टी-२० सामन्यांमध्येसर्वाधिक वेळा विजय मिळवलाय. 


- धोनीला फिनिशर म्हटले जाते. आशिया कपमध्येही त्याने अखेरचा षटकार लगावत फिनिशर म्हणून आपले बिरुद्ध पुन्हा सिद्ध केले. विजयासाठी लक्ष्याचा पाठलाग करताना धोनीने वनडे सामन्यात आतापर्यंत नऊ वेळा षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिलाय. तर टी-२०मध्ये तीन वेळा षटकार खेचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलंय. 


- आशिया कपच्या फायनलमध्ये शिखर धवनने ४४ चेंडूत ६० धावांची खेळी केली. टी-२० क्रिकेटमधील धवनची ही मोठी खेळी आहे. याआधी श्रीलंकेविरुद्ध त्याने ५१ धावा लगावल्या होत्या. 


- धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत क्रिकेट वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी, टी-२० वर्ल्ड कप, आशिया कप, आशिया कप टी-२०, ट्राय सिरीज इन ऑस्ट्रेलिया, आयपीएल तसेच चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धांचे जेतेपद पटकावलेय.