सॅल्युट! `सर्जिकल स्ट्राईक`नंतर वीरुनं दिली अशी प्रतिक्रिया...
उरी हल्ल्यानंतर आज भारतानं पाकव्याप्त काश्मीर भागात `सर्जिकल स्ट्राईक` देत दहशतवाद्यांना चोख प्रत्यूत्तर दिलं. यानंतर भारतीयांनी भारतीय जवानांच्या या शौर्याचं कौतुक करत त्यांचं अभिनंदन केलंय.
नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर आज भारतानं पाकव्याप्त काश्मीर भागात 'सर्जिकल स्ट्राईक' देत दहशतवाद्यांना चोख प्रत्यूत्तर दिलं. यानंतर भारतीयांनी भारतीय जवानांच्या या शौर्याचं कौतुक करत त्यांचं अभिनंदन केलंय.
यामध्ये क्रिकेटर विरेंद्र सेहवाग याचाही समावेश आहे. इतर भारतीयांप्रमाणे वीरुनंही या प्रत्यूत्तराचं आणि भारताच्या कमांडोजचं कौतुक केलंय.
उरीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 18 जवान शहीद झाल्याची बातमी ऐकून वीरु हळहळला होता.
भारत सरकार आणि भारतीय सेनेनं उचललेल्या या पावलामुळे केवळ विरुलाच नाही तर शहीदांच्या कुटुंबियांनाही कौतुकच वाटेल यात शंका नाही.