कोलम्बो : श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशाननं वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. निवृत्तीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिलशाननं काही धक्कादायक दावे केले आहेत. 10 महिने श्रीलंकेचा कर्णधार असताना मला योग्य पाठिंबा मिळाला नाही. ज्याप्रकार मला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आलं यामुळे मी दु:खी झाल्याचंही दिलशान म्हणाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2011मध्ये मी कर्णधारपदाची धुरा सांभाळली, पण माझ्या बोटांना दुखापत झाली त्यावेळी दोन माजी कर्णधारांनी पुन्हा कर्णधारपद स्वीकारायला नकार दिला. यापैकी एकाला मनवण्यात आल्यानंतर तो कर्णधार व्हायला तयार झाला, अशी प्रतिक्रिया दिलशाननं दिली आहे. कुमार संगकारा आणि महिला जयवर्धनेबद्दल नाव न घेता दिलशाननं ही टीका केली आहे. 


2011मध्ये इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टआधी दिलशानला दुखापत झाली, तेव्हा संगकारानं रोज बोलमध्ये झालेल्या टेस्टमध्ये श्रीलंकेचं नेतृत्व केलं. दिलशाननं श्रीलंकेचा आत्ताचा कर्णधार एन्जेलो मॅथ्यूजवरही टीका केली आहे. मी कर्णधार असताना दुखापतीचं कारण देत मॅथ्यूजनं बॉलिंग करायला नकार दिला होता, पण मी कर्णधारपद सोडल्यावर एकाच आठव्यात मॅथ्यूजनं बॉलिंगला सुरुवात केली, असं दिलशान म्हणाला आहे.