सिडनी :  टेनिस सुंदरी मारिया शारापोवाला २ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेदरम्यान मेलडोनियम या बंदी घातलेल्या औषधाचे सेवन केल्याप्रकरणी पॉझिटीव्ह आढळल्यानंतर शारापोवाला दोन वर्षासाठी निलंबित करण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाच वेळा ग्रँडस्लॅम पटकावलेल्या रशियाच्या या स्टार खेळाडूला याआधी मार्च महिन्याच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने अनिश्चित काळापर्यंत निलंबित केले होते.


दरम्यान, बुधवारी देण्यात आलेल्या निकालामध्ये सांगण्यात आले की, शारापोव्हाचा उद्देश फसवणूक करण्याचा नव्हता. मात्र पॉझिटीव्ह रिपोर्टसाठी ती एकटी जबाबदार आहे. शिवाय यामध्ये तीची खूप मोठी चूकही आहे.


तसेच, दोन वर्षांच्या लागलेल्या बंदीविरुध्द शारापोव्हा अपील करु शकते, परंतु तिच्याकडून अद्याप कोणताच निर्णय आलेला नाही.


'ऑस्टे्रलिया ओपन दरम्यान पॉझिटीव्ह निकाल आल्यानंतर दोन फेब्रुवारीला मॉस्को येथे झालेल्या स्पर्धेतही झालेल्या चाचणीत मारिया शारापोव्हाने मेलडोनियमचे सेवन केल्याचे निष्पण झाले होते,' असं आयटीएफने सांगितले आहे.