मुंबई : आयपीएलच्या नवव्या सिझनच्या फायनलमध्ये सनरायजर्स हैदराबादनं रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरचा पराभव केला आणि आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. या विजयानंतर सनरायजर्स हैदराबादचा कॅप्टन डेव्हिड वॉर्नरवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्ताचा खेळाडू उमर अकमल यानंही डेव्हिड वॉर्नरला शुभेच्छा देणारं ट्विट केलं. पण या ट्विटवरून उमर अकमलची ट्विटरवर खिल्ली उडवण्यात आली. हे ट्विट करताना उमर अकमलनं चूक केली. 


डेव्हिड वॉर्नर आणि त्याचा टीमला शुभेच्छा, वेल डिझर्विंग टीम #psl2016final असं ट्विट अकमलनं केलं, पण हॅशटॅगनंतर आयपीएल लिहिण्याऐवजी त्यानं पीएसएल लिहीलं. पीएसएलचा फूल फॉर्म पाकिस्तान सुपर लीग आहे. ही चूक लक्षात आल्यावर अकमलनं लगेच आपलं ट्विट बदललं आणि त्यामध्ये आयपीएल लिहीलं. तोपर्यंत मात्र अकमलची मस्करी झाली होती.