मुंबई : क्रिकेटमध्ये नेहमीच अनिश्चितता असते, असं म्हटलं जात, क्रिेकेटमध्ये शेवटच्या क्षणाला काहीही होऊ शकतं, जिंकणाऱ्या टीमच्या हाती पराभव, तर पराभवाकडे जाणाऱ्या टीम विजयश्री खेचून आणते.


(व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात असाच एक रोमांचक वन-डे सामना झाला होता, ज्यात दक्षिण आफ्रिकेचा 1 रनने विजयी ठरला होता.


वेस्ट इंडिजला एका षटकात जिंकण्यासाठी फक्त 4 रन्स हवे होते, आणि तीन विकेट शिल्लक होत्या. वेस्ट इंडिजसमोर जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेने 285 धावांचं आव्हान ठेवलं होतं. कुणालाही वाटलं नव्हतं या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव होईल.


281 रन्सवर सात विकेटच्या स्कोरवर वेस्ट इंडिज टीम पन्नासाव्या, म्हणजेच शेवटच्या षटकात खेळत होती. मात्र वेस्ट इंडिजचे लगोपाठ तीन गडी बाद झाले, आणि संपूर्ण टीम 283 धावांवर बाद झाली, हा रोमांचक सामना दक्षिण आफ्रिकेन 1 रनने जिंकला.