अफगाणिस्तानचा रशिद खानने पटकावली पर्पल कॅप...
![अफगाणिस्तानचा रशिद खानने पटकावली पर्पल कॅप... अफगाणिस्तानचा रशिद खानने पटकावली पर्पल कॅप...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2017/04/09/223676-rashidkhan.jpg?itok=NbGHd2ZB)
सन राईजर्स हैदराबादकडून शानदार कामगिरी करत अफगाणिस्तानच्या रशिद खान याने पर्पल कॅप पटकाविण्याचा मान मिळविला आहे. त्याने दोन सामन्यात पाच विकेट घेत पर्पल कॅप परिधान केली आहे.
हैदराबाद : सन राईजर्स हैदराबादकडून शानदार कामगिरी करत अफगाणिस्तानच्या रशिद खान याने पर्पल कॅप पटकाविण्याचा मान मिळविला आहे. त्याने दोन सामन्यात पाच विकेट घेत पर्पल कॅप परिधान केली आहे.
यंदाच्या आयपीएल सिझनमध्ये दोन अफगाणिस्तानी खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. त्यातील रशिद खान याने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित करत दोन सामन्यात पाच विकेट घेतल्या आहेत.
आजच्या सामन्यात रशिदने ४ षटकात १९ धावा देत ३ विकेट घेतल्या आहे. त्याने सुरूवातीला मॅक्युलम, त्यानंतर अरॉन फिन्च आणि मग गुजरातचा कर्णधार सुरेश रैना याला पायचित बाद केले.
पाहू या आजच्या सामन्यातील रशिदच्या विकेट