भारतीय खेळाडूंकडून उरी हल्ल्याचा निषेध
जम्मू-काश्मीरमधील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय.
उरी : जम्मू-काश्मीरमधील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तर हा हल्ला भ्याड हल्ला असल्याचे म्हटलेय. भारताच्या खेळाडूंनीही ट्विटरवरुन या हल्ल्याचा निषेध व्यक्त केलाय.
भारताचा बॉक्सर विजेंदर सिंग आणि माजी क्रिकेटपटू वीरेंदर सेहवाग यांनी ट्विट करुन हल्ल्याप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केलीये.
उरीमधल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 17 जवान शहीद झाले तर 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळालेय.