मुंबई : टी-२० वर्ल्डकपमध्ये खराब प्रदर्शनामुळे पाकिस्तानला साखळी फेरीतूनच बाहेर पडावे लागले. पाकिस्तानच्या पराभवाची जबाबदारी घेत वकार युनूस यांनी पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता नव्या कोचसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा शोध सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्या वेबसाईटवर जाहिरातही दिलीये. जागतिक क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाचा कोच होणं ही खरतर कठीण गोष्ट आहे. क्रिकेटसंबंधित समस्या वगळता तेथे सुरक्षेचीही भिती आहे. मात्र भारताच्या एका माजी क्रिकेटपटूला पाकिस्तानचा कोच व्हायचे आहे. 


माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीने ट्विटवर आपण पाकिस्तानचा मुख्य प्रशिक्षण होण्यासाठी उपलब्ध असल्याचे म्हटलेय. दरम्यान, मुंबईच्या या माजी क्रिकेटपटूला या उच्च स्तरावर कोचिंगचा अनुभव नाही. त्यामुळे कांबळीने दर्शविलेल्या तयारीवर पीसीबीचा निर्णय़ काय असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.