मुंबई : बॅटमिंटनच्या महिला सिंगल्सच्या फायनलमध्ये धडक देणारी पीव्ही सिंधू गोल्ड मेडल पटकवण्यासाठी आज मैदानावर उतरेल. फाइनलमध्ये तिचा सामना स्पेनची वर्ल्ड चॅम्पियन कॅरोलिना मारिनसोबत होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आधी क्वॉर्टरफाइनलमध्ये सिंधूने चीनची खेळाडू आणि जगात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या वांग यिहानला पराभूत केलं होतं. यानंतर सिंधुवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. आजच्या फायनल मॅचसाठी देखील तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत. भारताचा क्रिकेटर आणि टेस्ट फॉरमॅटचा कर्णधार विराट कोहलीने देखील सिंधुला वेस्ट इंडिजमधून शुभेच्छा दिल्या आहेत.


पाहा काय बोलला विराट कोहली.