जे सचिनसोबत झालं तेच कोहलीसोबतही झालं
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं भारताचा पराभव केला. या पराभवामुळे सव्वाशे कोटी भारतीयांचं स्वप्न भंगलं.
मुंबई: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं भारताचा पराभव केला. या पराभवामुळे सव्वाशे कोटी भारतीयांचं स्वप्न भंगलं.
पण या पराभवावेळीही विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्यामधला योगायोग पाहायला मिळाला. या मॅचमध्ये भारत हरला तरी हिरो ठरला विराट कोहली. पण पराभव झाल्यानंतर विराट कोहली भावूक झाला.
अशीच काहीशी घटना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबतही घडली होती. तो दिवसही होता 31 मार्च.
31 मार्च 1997 मध्ये बारबाडोस टेस्टमध्ये सचिनच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या मॅचमध्ये भारताला वेस्ट इंडिजकडून पराभव स्वीकारावा लागला होता. 120 रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करता करता टीम इंडिया केवळ 81 रन्सवर ऑल आऊट झाली होती. या पराभवानंतर सचिन तेंडुलकर हमसून हमसून रडला होता.
आपल्या कॅप्टन्सीच्या काळात सचिनला काही फारसं यश मिळालं नव्हतं. सलग अनेक मॅचमध्ये टीम इंडियाला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. याच दरम्यान वेस्ट इंडिजविरुद्धच्या या पराभवानंतर सचिननं क्रिकेटला रामराम ठोकण्याचाही विचार केला होता.