राजकोट : इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातील चौथ्या दिवसी सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष कर्णधार विराट कोहलीच्या खेळीकडे होते. भारताच्या बाजूने सामना झुकवण्यात कोहली महत्त्वाचे योगदान देईल अशी अपेक्षा होती मात्र चांगली फलंदाजी करत असलेला विराट कोहली अचानक पॅव्हेलियनमध्ये परतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लेगस्पिनर आदिल रशीदने १२४व्या षटकातील तिसरा चेंडू टाकला आणि संपूर्ण मैदानात शांतता पसरली. कोहली आणि फॅन्स हैराण झाले की नक्की झाले तरी काय. दुसरीकडे इंग्लंडचे क्रिकेटरपटू मात्र आनंद व्यक्त करत होते. 


रशीदचा चेंडू खेळण्याच्या नादात त्याचा पाय स्टंपला लागला. त्यामुळे थर्ड अंपायरनी विराटला हिट विकेटवर बाद ठरवले. हिट विकेटवर बाद झालेला विराट दुसरा कर्णधार आहे. कोहलीने ९५ चेंडू खेळून काढताना ४० धावा केल्या. विराटच्या आधी १९४९मध्ये लाला अमरनाथ हिट विकेटवर बाद झाले होते.