नवी दिल्ली : इंदौर टेस्टमध्ये कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा जबरदस्त खेळीचं प्रदर्शन केलं आहे. कोहलीच्या चांगल्या खेळीमुळे टीम इंडियाने न्यूजीलंड विरोधात चांगला स्कोर उभा केला आहे. धडाकेबाज कोहलीने संयमी खेळी करत त्याचं टेस्ट करिअरमधलं दुसरं शतक पूर्ण केलं आहे. यासोबतच तो दुहेरी शतक ठोकणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे.


कोहलीने वेस्टइंडीज विरोधात पहिलं शतक ठोकलं होतं. त्याने २०० रन्सची जबरदस्त कामगिरी केली होती. कोहलीने न्यूजीलंडविरोधात मैदानावर शानदार शॉट्स लगावले आणि न्यूझीलंडच्या बॉलर्सची चांगलीच परीक्षा घेतली. पहिल्या दिवशी त्याने नॉटआऊट १०३ रन केले. दूसऱ्या दिवशीही त्याने आक्रमक खेळीने सुरवात करत दुसरं शतक ठोकलं आणि दुहेरी शतक ठोकणारा पहिला भारतीय कर्णधार बनण्याचा मान पटकावला.