मुंबई : हैदराबादमध्ये सुरु असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी भारताचा कर्णधार विराट कोहली शुक्रवारी शानदार द्विशतकी खेळी साकारली. त्याच्या अद्वितीय खेळीबद्दल सर्वच स्तरातून त्याचे कौतुक होतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विटरवरही कोहलीच्या या विराट खेळीचे कौतुक झाले. विनोदी शैलीत अनेकांनी त्याच्या या खेळीची स्तुती केली. 


पहिल्या डावात खेळताना विराटने २४६ चेंडूत धडाकेबाज २०४ धावांची खेळी केली. विराटचे द्विशतक, विजय आणि साहाचे शतक याच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ६८७ धावांपर्यंत मजल मारली.