चेन्नई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीतील पहिल्या दिवशी मैदानावर अशी घटना घडली ज्यामुळे नेहमी रागीट दिसणारा विराट कोहलीही आपले हसू रोखू शकला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामन्यात विराटच्या एका चुकीमुळे इंग्लंडला पाच धावा मिळाल्या. मात्र त्यानंतरही विराट चिडला नाही तर त्याला हसू आले. सामन्याच्या 25व्या ओव्हरमध्ये अश्विम बॉलिंग करत होता. क्रीजवर ज्यो रुट खेळत होता. या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर फटका मारला तो फाईन लेगच्या दिशेने गेला. यावेळी फिल्डिंग कऱणाऱ्या विराटने बाउंड्री लाईनच्या दिशेने जाणाऱ्या चेंडूला रोखले आणि बॉल स्टम्पच्या दिेशेने थ्रो केला. मात्र तो बॉल विकेटकीपरकडे जाण्याऐवजी मैदानावर असलेल्या पार्थिव पटेलच्या हेल्मेटला लागला. 


यामुळे इंग्लंडला पाच धावांचा फायदा मिळाला. आयसीसीच्या नियमानुसार विकेटकीपरच्या पाठीमागे ठेवलेल्या हेल्मेटला बॉल लागल्यास बॅटिंग करणाऱ्या टीमला 5 धावा मिळतात. आपल्याकडून झालेला चुकीचा थ्रो पाहून विराटलाही हसू आवरले नाही.