मुंबई : टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारताचा पराभवाने क्रिकेट चाहत्यांची मोठी निराशा झाली. मात्र त्यानंतरही त्यांचा टीम इंडियाला सपोर्ट कायम होता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


तुम्ही सेमीफायनलमध्ये जरी हरलात तरी आमचा तुम्हाला कायम सपोर्ट राहील अशा प्रकारचे मेसेजही सोशल मीडियावर फिरत होते. टीम इंडियाला दिलेल्या सपोर्टबद्दल भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने ट्विटरवरुन आभार मानलेत.


या संपूर्ण स्पर्धेदरम्यान तुम्ही दिलेल्या पाठिंब्याबद्दल खूप आभार असे त्याने ट्विट केलेय. 


विराटने टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. त्याच्या खेळीमुळेच भारत वर्ल्डकपच्या सेमीफायनलपर्यंत पोहोचू शकला.