मुंबई :  एक वेळ होती, जेव्हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं ग्लॅमर होतं, तसंच ग्लॅमर आता टीम इंडियात विराट कोहलीला आहे. यात कोणतीही शंका नाही की, यावेळेस आता मॅच विनर विराट कोहली आहे. पण विराट सचिनपेक्षाही मोठा मॅच विनर आहे का?


विराट कोहली 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१७ ट्वेन्टी-२० सामन्यात कोहलीने ७१८ रन्स केले.
८ अर्धशतकं
७ वेळेस नाबाद
एकूण ४० ट्वेन्टी-२० सामन्यात १४ अर्धशतक विराटने केली (एकूण १ हजार ९२ रन्स)
ट्वेन्टी-२० सामन्यात जेव्हा विराटने  व्यक्तिगत ४० पेक्षा अधिक पन्स केले, तेव्हा ७० टक्के भारताला विजय मिळाला आहे.


सचिन तेंडुलकर 


सचिन भारतासाठी फक्त एक टी-२० सामना खेळला आहे. २००६ मध्ये दक्षिण आफ्रिका विरूद्ध खेळताना टी-२० सामन्यात सचिनने १० रन्स काढले, त्यात भारत विजयी झाला होता.


सचिन ४६३ वनडे सामन्यात ४५२ वेळेस खेळला आहे, यात ४९ शतकं सचिनने लगावली, यातील ३३ सामन्यांमध्ये भारत जिंकला आहे. एक मॅच टाय झाली होती, एकाचा काहीही निकाल आला नाही, तर १४ सामन्यात भारताचा पराभव झाला होता.


कोहलीचे वनडे सामन्यात २५ शतकं आहेत. यात २१ सामन्यांमध्ये भारताला विजय मिळाला आहे, तर फक्त ४ सामन्यात भारताचा पराभव झाला आहे.


सचिन आणि कोहलीत तुलना करणे घाईचे होईल, कारण सचिन जेवढं क्रिकेट खेळला, त्यापैकी अर्ध वेळ क्रिकेटही विराट खेळलेला नाही.


'वनडे'मध्ये विराट कोहली टीम इंडिया सचिननंतर जास्त शतकं लगावणार क्रिकेटर आहे, सचिननंतर विराटचा शतकं लगावण्यात टीम इंडियात दुसरा नंबर आहे. 


सचिनच्या ४९ शतकांच्या तुलनेत, विराटने २५ शतकं वनडेत लगावली आहेत, सौरव गांगुलीने २२ शतकं लगावली आहेत. विराट कोहलीकडे आणखी बराच वेळ आणि संधी रेकॉर्ड तोडण्यासाठी आहे.