कोहली याच वेगाने शतक झळकवत राहिला तर...
मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात कोहलीने नाबाद 154 धावांची खेळी करत भारताला विजय मिळवून दिला.
मोहाली : मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात कोहलीने नाबाद 154 धावांची खेळी करत भारताला विजय मिळवून दिला.
कोहलीने 134 चेंडूत 154 नाबाद धावा केल्या. यात 16 चौकार आणि एक षटकाराचा समावेश आहे. जेव्हा विराट खेळण्यासाठी मैदानात आला होता तेव्हा भारताची धावसंख्या एक बाद 13 अशी होती.
मोहालीच्या मैदानातील विराटचे कारकिर्दीतील 26वे शतक आहे. 174व्या सामन्यात कोहलीने 26वे शतक पूर्ण केले. याच वेगाने विराटने शतके झळकावली तर वनडेतील सर्वाधिक शतके नावावर असलेल्या क्रिकेटपटूंच्या यादीत लवकरच तो दुसरे स्थान मिळवेल.
या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 49 शतकांसह पहिल्या स्थानी आहे. त्यानंतर रिकी पाँटिंगच्या नावावर 30 शतके आहेत. तर सनथ जयसूर्याने 404 वनडेत 28 शतके झळकावलीत.