सिडनी : पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तीन सामन्यांची कसोटी खेळली गेली, यातील शेवटची कसोटी आज सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळली जात आहे. यात डेविड वॉर्नरने ७८ चेंडूत १०० धावा केल्या. पाकिस्तानी बॉलर्सची धुलाई करत वॉर्नरने दुपारच्या जेवणाआधी सेंचुरी पूर्ण केली. लंच ब्रेकआधी सेंचुरी करण्यात वॉर्नर जगातील पाचवा बॅटसम समजला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आधी क्रिकेटमध्ये १९७६ साली पाकिस्तानी बॅटसमन माजिद खानने न्यूझीलंड विरोधात नॉट आऊट खेळताना १०८ रन्स केले होते. या ५ बॅटसमनमध्ये माजिद खान हे एकमेवर असे आहेत की, ते ऑस्ट्रेलियाचे बॅटसमन नाहीत. याशिवाय विक्टर ट्रंपरने हा रेकॉर्ड १९०२ मध्ये केला होता, तर चार्ल्स मॅकेरटनीने या रेकॉर्ड १९२६ मध्ये केला होता, आणि सर डॉन ब्रॅडमन यांनी १९३० साली ही रेकॉर्ड केला होता.


कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या इनिंगमध्ये २००१ साली सर्वात जलद शतक झळकावण्याचा रेकॉर्ड सहवागच्या नावे आहे. सहवागने २५.३ ओव्हरमध्ये शतक ठोकलं होतं. सहवाग लंच ब्रेकच्या वेळी नॉट ऑऊट ९९ स्कोअरवर होता, सहवागने २००६ साली वेस्ट इंडिजच्या विरोधात हा कारनामा केला होता.


या सामन्यात सहवागने १९० चेंडूत १८० रन्स केले होते. यावेळी वॉर्नरने जेव्हा शतक ठोकलं तेव्हा, या इंनिगची २६.२ ओव्हर झाले होते. यामुळे सहवागचा रेकॉर्ड तुटता तुटता राहून गेला.