भारताच्या दणदणीत विजयानंतर सेहवागचे इंग्लंडला चिमटे
भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये इंग्लंडचा दारूण पराभव झाला. भारतानं अशक्य वाटणारं 351 रनचं टार्गेट तीन विकेट आणि 11 बॉल राखून पार केलं.
पुणे : भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये इंग्लंडचा दारूण पराभव झाला. भारतानं अशक्य वाटणारं 351 रनचं टार्गेट तीन विकेट आणि 11 बॉल राखून पार केलं. या विजयाचे शिल्पकार ठरले विराट कोहली आणि केदार जाधव. शानदार सेंच्युरी झळकावणाऱ्या या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं खास त्याच्या शैलीमध्ये भारताला विजयच्या शुभेच्छा देतानाच इंग्लंडला चिमटे काढले आहेत. 'दस गुना लगान वसूल' असं ट्विट सेहवागनं केलं आहे. तर हरभजन सिंगनंही भारतीय टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 'रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप लगते है, नाम हे विराट कोहली' असं ट्विट हरभजननं केलं आहे.