मुंबई : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतानं पाकिस्तानचा 3-2नं पराभव केला आहे. यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं पुन्हा एकदा पाकिस्तानला डिवचलं आहे. याबाबतचं एक ट्विट सेहवागनं केलं आहे.


माँ की ममता जीत आसान बना देती है, ही कालची गोष्ट होती. तर बाप बाप होता है, नो मौका मौका ही आजची गोष्ट आहे, असं ट्विट सेहवागनं केलं आहे. शनिवारी न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये भारतीय खेळाडूंनी त्यांच्या आईचं नाव असेलली जर्सी घातली होती. याचा संदर्भ घेऊन सेहवागनं पाकिस्तानला चिडवलं आहे.