नागपूर : नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगलेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०मध्ये भारताने थरारक विजय मिळवलाय. बुमराहचे अखेरचे षटक भारतासाठी निर्णयाक ठरले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशिष नेहरा आणि बुमराह यांच्या गोलंदाजीचे यावेळी विराट कोहलीने कौतुक केले. भारताची धावसंख्या सन्मानजनक झालेली नसतानाही मला विश्वास होता की आम्ही सामना जिंकून मालिकेत बरोबरी करु. विशेषकरुन नेहरा आणि बुमराह यांच्या गोलंदाजीचे विराटने कौतुक केले.


कोहली म्हणाला, विश्वास कायम ठेवणे महत्त्वाचे असते. आमच्यासोबत असे घडलेय की आम्ही सुरुवात चांगली करतो. मात्र मध्य ओव्हरमध्ये आम्ही आमची लय कायम ठेवू शकत नाही. मात्र आजच्या सामन्यातील मध्य ओव्हरमध्येम स्पिनर्सची गोलंदाजी आणि त्यानंतर नेहरा आणि बुमराह यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. नेहराला माहीत होते काय करायचे आहे ते आणि बुमराह प्रत्येक चेंडूसाठी माझा सल्ला घेत होता. मी त्याला स्वत:ची शैली वापरण्याचा सल्ला दिला होता.