मुंबई : २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक घोषित झालं आहे. हे वेळापत्रक आणि दोन्ही ग्रुपवर नजर टाकली तर यामध्ये वेस्ट इंडिजचा संघ तुम्हाला दिसणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडमध्ये २०१७ साली होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये वेस्ट इंडिजचा संघ सहभागी होणार नाही. आयसीसीच्या नियमांनुसार चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आयसीसी वनडे रॅकिंगमधले टॉप ८ टीम सहभागी होतात. आता वेस्ट इंडिजची टीम रॅकिंगमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. 


पण चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक बनवताना ३० सप्टेंबर २०१५ सालचं रॅकिंग बघण्यात आलं. या दिवशी वेस्ट इंडिजची टीम टॉप ८ मध्ये नसल्यामुळे त्यांना २०१७ च्या या चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकावं लागणार आहे.