नागपूर: टी 20 वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजनं दक्षिण आफ्रिकेचा 3 विकेट्सनं पराभव केला आहे. वेस्ट इंडिजनं या विजयामुळे सेमी फायनल गाठली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टॉस जिंकून वेस्ट इंडिजनं पहिले दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगला पाठवलं, त्यानंतर त्यांनी 20 ओव्हरमध्ये फक्त 122 रन बनवल्या. 123 रनचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचीही पडझड झाली. अखेर शेवटचे दोन बॉल बाकी असताना वेस्ट इंडिजचा विजय झाला. 


वेस्ट इंडिजनं आत्तापर्यंत या स्पर्धेत खेळलेले तिन्ही मॅच जिंकल्या आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे आता 6 पॉईंट्स आहेत. तर इंग्लंड 4 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2 पॉईंट्ससह दक्षिण आफ्रिका तिसऱ्या तर श्रीलंका चौथ्या क्रमांकावर आहे. 


या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेचं सेमी फायनलमध्ये जायचं स्वप्न आणखी कठीण झालं आहे. कारण दक्षिण आफ्रिकेची आता केवळ एक मॅच राहिली आहे. ही मॅच आफ्रिका जिंकली तरी त्यांचे 4 पॉईंट्स होतील, आणि त्यांना इतर टीमच्या परफॉर्मन्सवर अवलंबून राहावं लागेल. 


श्रीलंकेचे मात्र दक्षिण आफ्रिकेएवढेच पॉईंट्स असले तरी त्यांच्या आणखी 2 मॅच बाकी आहेत.