Whatsapp अँड्रॉइडसाठी नवीन अपडेट, अनेक नवीन फिचर्स उपलब्ध
व्हॉट्सअॅपने नुकतेच iOSसाठी एक अपडेट दिले आहे, त्यात व्हिडिओ झूमसह अनेक फिचर दिले आहे. आता अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्ससाठी कंपनी एक अपडेट दिले आहे.
मुंबई : व्हॉट्सअॅपने नुकतेच iOSसाठी एक अपडेट दिले आहे, त्यात व्हिडिओ झूमसह अनेक फिचर दिले आहे. आता अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्ससाठी कंपनी एक अपडेट दिले आहे.
या अपडेटमधून चॅटमधून लिंक कॉपी करणे खूप सोपे झाले आहे. तसेच यात चॅटमध्ये ऑप्शन देण्यात आले आहेत त्याने लिंक शेअरची हिस्ट्री पाहता येणार आहे.
येत्या काही दिवसात हे अपडेट तुम्हांल गूगल प्लेला दिसणार आहे. आता हे व्हर्जन कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे, तेथून डाऊनलोड करता येणार आहे.
अपडेटचा काय होणार फायदा जाणून घ्या....
१) चॅट क्लिअर करण्याचा मिळणार ऑप्शन
सध्या क्लिअर चॅट केल्यावर पूर्वी केलेल्या चॅट्स मोबाईलमधून उडून जातात. या अपडेटमध्ये तीन ऑप्शन देण्यात आले आहेत. त्यात युजर्स ३० दिवस, सहा महिने जुने चॅट क्लिअर करू शकतील. तसेच काही मेसेज स्टार केल्यास तो सेव्हचं ऑप्शन देण्यात आले आहे.
२) नव्या टॅबमध्ये दिसणार पाठविलेल्या लिंक्स
सर्व चॅट्समध्ये एक मीडिया स्क्रीन असणार आहे. यात पाठविलेला आणि रिसिव्ह केलेले व्हिडिओ मेसेज पाहायला मिळणार आहे. येथून एखाद्या ग्रूपमध्ये किंवा पर्सनल चॅटवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओ आणि फोटोंना पाहता येणार आहे. हे फिचअर फेसबूक मेसेंजरच्या Shared Image मिळते जुळते फिचर आहे.
३) लिंक कॉपी करणे होणे सोपे
यापूर्वी व्हॉट्सअॅपवर पाठवलेली लिंक कॉपी करणे खूप अवघड काम होते. पण आता नव्या अपडेटमध्ये लॉग टॅप करू याला कॉपी केले जाऊ शकते. यापूर्वी असे करताना मेसेजही कॉपी केला जात होता.