मिरपूर : पाकिस्तानविरुद्धच्या हायवोल्टेज सामन्यात टीम इंडियाच्या विजयाचा हिरो विराट कोहली संपूर्ण सामन्यात जबरदस्त एग्रेशनमध्ये दिसला. फील्डिंगदरम्यानही जेव्हा अंपायरच्या एका चुकीच्या निर्णयावर विराटने जोरदार संताप व्यक्त केला. यावेळी त्याने अंपायरला अपशब्दही वापरले. बातमीच्या खाली व्हिडीओ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय झाले होते सामन्यात


पाकिस्तानची टीम बॅटिंग करत होती. सामन्याची ५वी ओव्हर सुरु होती. 


या ओव्हरमध्ये तिसऱ्या बॉलवर नेहरासमोर खुर्रम बॅटिंग करत होता. नेहराचा बॉल खेळण्यात खुर्रम चुकला आणि बॉल धोनीच्या हातात विसावला


स्पष्ट दिसत होत की बॉल बॅटच्या कडेला लागून कीपरकडे गेला. नेहरा आणि धोनी विकेट मिळवण्याचा जल्लोष करु लागले. मात्र तेव्हा अंपायने नॉटआऊट दिले. 


अंपायरच्या या चुकीच्या निर्णयावर धोनी-नेहराने नाराजी व्यक्त केली. मात्र विराट आपल्या भावना लपवू शकला नाही. त्याने नाराजी व्यक्त करता अंपायरला अपशब्द वापरला. 


कमेंटेटर्सनेही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. मात्र पुढच्या ओव्हरमध्ये विराटने खुर्रमला रनआऊट केले.