`आझादी पाहिजे असेल तर देश सोडून जा`
श्रीनगरमध्ये निवडणुकांनंतर परत येत असलेल्या सीआरपीएफच्या जवानांवर काश्मीरमधल्या तरुणांनी मारहाण केली.
नवी दिल्ली : श्रीनगरमध्ये निवडणुकांनंतर परत येत असलेल्या सीआरपीएफच्या जवानांवर काश्मीरमधल्या तरुणांनी मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीरनंही जवानांना मारहाण करणाऱ्यांना चपराक दिली आहे.
ज्यांना आझादी पाहिजे त्यांनी भारत सोडून जा. जवानांवर हल्ला करणाऱ्यांना १०० दहशतवाद्यांचा खात्मा करून प्रत्युत्तर द्यावं. काश्मीर आमचंच आहे. असं ट्विट गंभीरनं केलं आहे.
देशद्रोही आमच्या तिरंग्यामधले रंग विसरलेले आहेत. केशरी रंग आमच्यामध्ये असलेली क्रोधाची आग आहे. पांढरा रंग दहशतवाद्यांच्या कफनसाठी आणि हिरवा रंग दहशतवाद्यांच्या निषेधासाठी असं गंभीर म्हणाला आहे.