मुंबई : आशिया कपमध्ये भारताने विजया सोबत सुरुवात केली. पहिल्या मॅचमध्ये मिळालेल्या विजयानंतर आता भारत दुसऱ्या मॅचसाठी सज्ज झालाय. जगातील सर्वात मोठे विरोधक उद्या एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेर-ए-बांग्ला स्टेडिअमवर उद्या होणाऱ्या या सामन्यामध्ये सगळ्या जगाच्या नजरा असणार आहेत. पण या सामन्यामध्ये दुसरी एक वेगळी गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. उद्या एका पाकिस्तानी खेळाडूची पत्नी भारताला सपोर्ट करण्यासाठी येणार आहे.


'भारत-पाकिस्तान हा सामना खूप रोमांचक होणार असून युवा खेळाडूंसाठी मोठी संधी असणार आहे. उद्या सानिया मिर्झा ही देखील मॅच पाहायला येणार असून ती भारतीय टीमला सपोर्ट करणार आहे. पण शोएबने चांगलं खेळावं असं तिला वाटतंय.' असं शोएब मलिक याने म्हटलं आहे.