आगरतळा : रिओ ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारी दीपा कर्माकर तिला मिळालेली बीएमडब्ल्यू कार परत करणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या. बीएमडब्ल्यूचा खर्च दीपाला परवडत नसल्याचं या बातम्यांमध्ये सांगण्यात आलं होतं. या बातम्या चुकीच्या असल्याचं स्पष्टीकरण दीपानं दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन तेंडुलकरच्या हस्ते मला बीएमडब्ल्यू मिळाली, ती परत करायचा मी विचारही करू शकत नाही, असं दीपा म्हणाली आहे. एएनआयला दीपानं ही प्रतिक्रिया दिलेली आहे.


हैदराबाद बॅडमिंटन असोसिएशनकडून दीपाला ही गाडी देण्यात आली होती. आगरतळामध्ये बीएमडब्ल्यूचं शोरूम आणि सर्व्हिस सेंटर नसल्यामुळे दुसरी गाडी देण्याबाबत हैदराबाद बॅडमिंटन असोसिएशनशी संपर्क साधला असल्याचं दीपा म्हणाली आहे.