रहाणे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खेळणार? कुंबळेने केले स्पष्ट
शनिवारपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होतेय.
बंगळूरू : शनिवारपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होतेय.
या सामन्यापूर्वी बंगळुरूमध्ये दोन्ही संघांनी कसून सराव केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचा मुख्य कोच अनिल कुंबळे यानं अजिंक्य राहणेची पाठराखण केली.
करूण नायरचं एक त्रिशतक राहणेची दोन वर्षांची अत्यंत यशस्वी कारकीर्द झोकाळून टाकू शकत नाही, असं कुंबळे म्हणाला. पुणे टेस्टच्या दोन डावांमध्ये राहणेनं अनुक्रमे 13 आणि 18 धावा केल्यामुळे त्याच्यावर टीका होतेय.