नवी दिल्ली : देशातील अव्वल कुस्तीपटू एकाच वेळी तेही रेसलिंगच्या आखाड्यात नाही तर चक्क रॅम्प वॉक करताना पहिल्यांदाच पहायला मिळाले. निमित्त होतं प्रो रेसलिंग लीगच्या दुस-या सीझनचं. ऑलिम्पिक ब्राँझ मेडलिस्ट साक्षी मलिकनंही रॅम्पवर आपली जादू दाखवली. साक्षी मलिक रॅम्पवर आल्यानंतर तिला उपस्थितांनी भरभरुन दादही दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


फॅशन डिझायनर रोहित बालचे कपडे या कुस्तीपटूंनी परिधान केले होते. प्रो रेसलिंग लीगचा पहिला सीझन कमालीचा यशस्वी झाला होता आणि आता दुस-या सीझनसाठी भारतातील आघाडीचे कुस्तीपटू सज्ज झालेत.