योगावर द ग्रेट खलीची टीका
चांगल्या तब्येतीसाठी योगाचे फायदे आपण नेहमीच ऐकतो. भारतानं विनंती केल्यानंतर युनायटेड नेशन्सनंही आंतरराष्ट्रीय योगा दिनाची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही यामध्ये सहभाग घेतला.
मुंबई: चांगल्या तब्येतीसाठी योगाचे फायदे आपण नेहमीच ऐकतो. भारतानं विनंती केल्यानंतर युनायटेड नेशन्सनंही आंतरराष्ट्रीय योगा दिनाची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही यामध्ये सहभाग घेतला.
पण डब्ल्यूडब्ल्यूईमधला भारताचा सुपरस्टार द ग्रेट खलीनं मात्र योगावर टीका केली आहे. म्हातारी लोकं योगा करतात, असं खली म्हणाला आहे. योगामुळे तुम्हाला ऑलिम्पिकमध्ये मेडल्स मिळत नाहीत, नाहीतर कपाल भारती करुनच मेडल मिळाली असती, लोकं ग्रेट खली झाले असते ते पण बेडवर बसून, अशी टीका खलीनं केली आहे.
पण हे बोलतानाच योगा हा वेळ घालवण्यासाठी आणि बेकार नाहीये हे सांगायलाही खली विसरला नाही.