टीम इंडिया संधी नाही मिळाली म्हणून ढाक्याला खेळायला गेला हा IPL स्टार
आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करूनही टीम इंडियाच्या झिम्बाव्बे टूरसाठी निवड न झाल्याने हा स्टार ऑलराउंडर ढाका प्रिमिअर लीग खेळायला निघून गेला. अबहानी लिमिटेडकडून तो खेळणार आहे.
मुंबई : आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करूनही टीम इंडियाच्या झिम्बाव्बे टूरसाठी निवड न झाल्याने हा स्टार ऑलराउंडर ढाका प्रिमिअर लीग खेळायला निघून गेला. अबहानी लिमिटेडकडून तो खेळणार आहे.
हा खेळाडू आहे केकेआरचा ऑलराउंडर आणि या सिझनचा केकेआरचा सर्वात यशस्वी फलंदाज युसूफ पठाण...
युसूफ पठाण याने आपल्या १३ खेळींमध्ये ७२.२० च्या सरासरीने ३६१ धावा काढल्या. त्याचा या खेळीमुळे त्यांचा संघ आयपीएलच्या एलिमिनेटर पातळीपर्यंत पोहचला. पण त्यांना या ठिकाणी सनराईजर्स हैदराबादने नमवून पुढे प्रवेश केला.
युसूफ पठाण याने विराट कोहलीनंतर सिझनमध्ये सर्वाधिक ७२.२०ची सरासरीने धावा काढल्या आहेत.
असे असूनही त्याला आगामी झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये संधी मिळाली नाही.
युसूफ पठाणसह ढाका प्रिमिअर लीगमध्ये आयपीएलचा आणखी काही स्टार भाग घेणार आहे. यात मनोज तिवारी आणि उदय पॉल यांचा समावेश आहे.