भडकला युवराज, शानदार षटकारांसह बनविले ३५ रन्स
गेल्या अनेक दिवसांपासून शांत असलेला युवराज सिंग भडकला आणि त्याने श्रीलंकेविरूद्ध मंगळवारच्या सामन्यात शानदार फलंदाजी करत १८ चेंडूत शानदार ३५ धावा ठोकल्या.
ढाका : गेल्या अनेक दिवसांपासून शांत असलेला युवराज सिंग भडकला आणि त्याने श्रीलंकेविरूद्ध मंगळवारच्या सामन्यात शानदार फलंदाजी करत १८ चेंडूत शानदार ३५ धावा ठोकल्या.
१९४.४४ च्या स्ट्राइक रेटने युवराजने ही खेळी केली. या खेळीत त्याने तीन षटकार आणि तीन चौकार लगावले. जुना युवराज पुन्हा मैदानावर आल्याचा प्रयत्य आला.
असा बाद झाला युवराज
जोरदार शॉट मारण्याचा प्रयत्नात १७ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर युवराज बाद झाला. त्याने कुलशेखराला कॅच दिला. पण त्यापूर्वी त्याने चांगली खेळी करताना संघाला विजयाच्या जवळपास नेले होते.
युवराज सिंगने ४ थ्या विकेटसाठी विराट कोहलीच्या साथीने ५१ धावांची भागीदारी केली.
गेल्या विश्वकपमध्ये खराब खेळीमुळे युवराज सिंग सर्वांना व्हिलन वाटत होता. त्याला विश्व कपच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवाला जबाबदार धरत होते. पण आज युवराजने श्रीलंकेचा वचपा काढला आणि श्रीलंकेला स्पर्धेतून बाहेर काढले.