मुंबई : क्रिकेटर युवराज सिंग आणि बॉलिवूड अभिनेत्री हेजल किच यांचा विवाह लकवरच पार पडणार आहे. दोघेही लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. युवराज आणि हेजल यांचा विवाह 30 नोव्हेंबरला होणार आहे. हिंदू आणि शीख अशा दोन्ही धर्माच्या रितीरिवाजानुसार विवाह होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

30 नोव्हेंबरला पंजाबी पद्धतीने चंडीगडमध्ये विवाह होणार आहे तर 2 डिसेंबरला गोव्यात हिंदु पद्धतीने विवाह होणार आहे. मागील वर्षी 11 नोव्हेंबरला युवराज आणि हेजल यांचा इंडोनेशियामधील बालीमध्ये साखरपुडा झाला होता. दोघांच्या विवाहसोहळ्याची लग्न पत्रिका देखील आता समोर आली आहे. दोघांच्या विवाह सोहळ्याची ही पत्रिका चर्चेत आली आहे. कारण ते एका क्रिकेट थीमवर बनवण्यात आलं आहे. https://stm.india.com/marathi/sites/default/files/marrige.jpg


युवराजच्या विवाहाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. कार्डला युवराज हेजल प्रीमियर लीग असं नाव देण्यात आलं आहे. क्रिकेट स्टाईलमध्ये पत्रिका बनवण्यात आली आहे. दोघांचे कार्टून यामध्ये दाखवण्यात आले आहेत. दोघांनी ही लग्न पत्रिकेची कॉन्सेप्ट तयार केली आहे. कार्ड डिजायनर सँडी आणि कपिल खुराना यांनी त्यांनी अशा प्रकारे लग्न पत्रिका बनवण्यास सांगितलं होतं.