मुंबई : सध्या आयपीएलच्या तयारीला लागलेला टीम इंडियाचा क्रिकेटर 'गब्बर' अर्थात शिखर धवनला 'एप्रिल फूल' बनवण्यात आलंय... हे काम दुसरं तिसरं कुणी केलं नाही तर ते केलंय युवराज सिंगनं... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेत असलेल्या शिखरला त्याचा सनरायजर्स हैदराबादचा टीममेट युवीनं चक्क बायकोचं नाव घेत शिखरला एप्रिल फूल केलंय. 


'तुझ्या बायकोचा कॉल आहे... काही एमर्जन्सी आहे' असं युवीनं सांगताच अक्षरश: धावतच शिखर पाण्याबाहेर आला... आणि आपल्या बॅगेत असलेला फोन शोधायला त्यानं सुरुवात केली... 


हा मजेशीर व्हिडिओ युवराजनं इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.